डिव्हाइस सेटिंग्ज
इन्व्हॉईससाठी नवीन प्रिंटर कसे जोडायचे?
  • कॉन्फिगर डिव्हाईसवर जा
  • डिफॉल्ट इन्व्हॉईस प्रिंटर पर्यायावर असाइन करा निवडा
  • दिसणाऱ्या प्रिंटरच्या नावावर टॅप करा (जर समान नेटवर्कशी कनेक्ट केलेले असेल तर)
  • जर प्रिंटरचे नाव दिसत नसेल, तर ""अॅड मॅन्युअली"" पर्यायाचा वापर करा
  • थर्मल प्रिंटरसाठी 2/3 इंच टॅब आणि ए 4 प्रिंटरसाठी ए 4 टॅब निवडा
POS अॅप्लिकेशन ए4 प्रिंटरला सपोर्ट करते का?
हो. आमचे अॅप्लिकेशन ए4 आणि थर्मल प्रिंटर दोन्हीला सपोर्ट करते.
बारकोड स्कॅनर जोडण्याची प्रक्रिया काय आहे?
आपण ओटीजी केबल वापरुन आपल्या स्मार्टफोनमध्ये यूएसबी प्रकारचे बारकोड स्कॅनर कनेक्ट करू शकता. कोणत्याही अतिरिक्त आवश्यकतेशिवाय ही एक साधी प्लग अँड प्ले प्रक्रिया आहे.
स्मार्ट रिटेल कोणत्या भाषांना सपोर्ट करते आणि ते कसे निवडायचे?
स्मार्ट रिटेल सध्या इंग्रजी, हिंदी, स्पॅनिश आणि अरेबिक भाषेला सपोर्ट करते, इतर प्रादेशिक भाषा लवकरच जोडण्यात येतील:
अॅप्लिकेशनची भाषा बदलण्यासाठी :
  • मेन मेन्यूमध्ये सेटिंग्स वर टॅप करा
  • ऑप्शन टॅब वर जा
  • आवश्यक भाषा निवडा